Sunday, 22 February 2015

मी आणि रांगोळी 

मी  रोज   सारवते  अंगण सकाळी  उठून 
काढायला जाते  रांगोळी  सडा शिंपुन 
मोडते ,पुसते , परत परत काढते 
मनासारखे त्यात मी   रंग भरते 
काढता काढता विचार करते 
कोणती रांगोळी काढायची मी ठरवते 
कशी काढायची मला माहिती असते 
त्यातील रंगसंगती माझीच असते 
मी तिला सुंदर , सुबक करते 
नीट  नेटकी प्रमाणबद्ध करते 
मी काढते व घडवते तिला 
मग मी का घडवत नाही स्वतःला 
का होते मी इतकी हतबल 
खरच आहे का मी पूर्ण निर्बल 
कोणीही मोडत, पुसत मला 
पायदळी तुडवत असतं मला 
त्याला विराम द्यायलाच  हवा 
रांगोळीचा धडा घ्यायलाच हवा . 
रांगोळीचा धडा घ्यायलाच हवा !

Friday, 6 February 2015

Suk gaye to kya gam hai
Khade to ham ab bhi hai
Hariyali chhayengi jarror
Aur loutega fir se noor hi noor.


In the midst of plenty I am left high and dry
Offering perch to the birds, I try to reach  the sky.

Thursday, 5 February 2015

Mirror in translation



Mirror
Sylvia Plath

Today, once again I read Sylvia Plath's Mirror. One of my colleagues had a problem in comprehending the last two lines of the poem, especially the 'terrible fish' image. This poem has always been my favorite and now I feel an intense urge to translate it in Marathi. I do not know how successful I would be in this attempt  but believe that there is no harm in giving it a try.



आरसा 

मी  आहे  रूपेरी  आणि  तन्तोतन्त. माझे नाहीं पुर्वग्रह.
जे  काही  मी पाहतो ते दर्शवितो लगेचंच 
तसेचं  , न झाकोळता  प्रेमाने किंवा नावडीने.  
मी  नाही  निर्दय, फक्त सत्यवादी -
नेत्र  लहान देवाचा , चार  कोपरे असलेला .
बहुतेक  वेळी  मी चिंतन करतो समोरच्या  भिंतीचे .
ती आहे गुलाबी , ठिपकेदार . मी पाहिले आहे तिच्याकडे  इतक्या वेळा 
मला वाटते ती हिस्सा  आहे माझ्या हृदयाचा  . पण ती  विरून  जातें.  
चेहरे  आणि  काळोख वेगळे  करतात आम्हाला पुन्हा  पुन्हा.
आता मी आहे सरोवर . एक  स्त्री वाकून पाहते आहे माझ्यात ,
शोधते  आहे माझ्यात खोलवर , ती  जे आहे ते पाहण्यास .
नंतर ती  वळते त्या  खोतार्ड्यांकडे , मेणबत्त्या  किंवा चंद्र .
मी  पाहतो तिची पाठ , आणि प्रतिबिंबित करतो ती निष्ठेने .
ती पुरुस्कृत करते  मला  अश्रुंनी , आणि हातांच्या वळवळण्याने . 
मी  आहे महत्वपूर्ण  तिच्याकरिता . ती येते आणि जाते .
प्रत्येक  सकाळी  तिचा  चेहरा जागा घेतो अंधाराची .
माझ्यात  तिने  बुडविले आहे  एका  तरुण  मुलीला , आणि माझ्यात  एक वृध्द  स्त्री 
वाढते आहे  तिच्याकडे दिवंसेदिवस,  एका भयानक  मास्यासारखी.