मी आणि रांगोळी
मी रोज सारवते अंगण सकाळी उठून
काढायला जाते रांगोळी सडा शिंपुन
मोडते ,पुसते , परत परत काढते
मनासारखे त्यात मी रंग भरते
काढता काढता विचार करते
कोणती रांगोळी काढायची मी ठरवते
कशी काढायची मला माहिती असते
त्यातील रंगसंगती माझीच असते
मी तिला सुंदर , सुबक करते
नीट नेटकी प्रमाणबद्ध करते
मी काढते व घडवते तिला
मग मी का घडवत नाही स्वतःला
का होते मी इतकी हतबल
खरच आहे का मी पूर्ण निर्बल
कोणीही मोडत, पुसत मला
पायदळी तुडवत असतं मला
त्याला विराम द्यायलाच हवा
रांगोळीचा धडा घ्यायलाच हवा .
रांगोळीचा धडा घ्यायलाच हवा !
No comments:
Post a Comment