Mirror
Sylvia Plath
Today, once again I read Sylvia Plath's Mirror. One of my colleagues had a problem in comprehending the last two lines of the poem, especially the 'terrible fish' image. This poem has always been my favorite and now I feel an intense urge to translate it in Marathi. I do not know how successful I would be in this attempt but believe that there is no harm in giving it a try.
आरसा
मी आहे रूपेरी आणि तन्तोतन्त. माझे नाहीं पुर्वग्रह.
जे काही मी पाहतो ते दर्शवितो लगेचंच
तसेचं , न झाकोळता प्रेमाने किंवा नावडीने.
मी नाही निर्दय, फक्त सत्यवादी -
नेत्र लहान देवाचा , चार कोपरे असलेला .
बहुतेक वेळी मी चिंतन करतो समोरच्या भिंतीचे .
ती आहे गुलाबी , ठिपकेदार . मी पाहिले आहे तिच्याकडे इतक्या वेळा
मला वाटते ती हिस्सा आहे माझ्या हृदयाचा . पण ती विरून जातें.
चेहरे आणि काळोख वेगळे करतात आम्हाला पुन्हा पुन्हा.
आता मी आहे सरोवर . एक स्त्री वाकून पाहते आहे माझ्यात ,
शोधते आहे माझ्यात खोलवर , ती जे आहे ते पाहण्यास .
नंतर ती वळते त्या खोतार्ड्यांकडे , मेणबत्त्या किंवा चंद्र .
मी पाहतो तिची पाठ , आणि प्रतिबिंबित करतो ती निष्ठेने .
ती पुरुस्कृत करते मला अश्रुंनी , आणि हातांच्या वळवळण्याने .
मी आहे महत्वपूर्ण तिच्याकरिता . ती येते आणि जाते .
प्रत्येक सकाळी तिचा चेहरा जागा घेतो अंधाराची .
माझ्यात तिने बुडविले आहे एका तरुण मुलीला , आणि माझ्यात एक वृध्द स्त्री
वाढते आहे तिच्याकडे दिवंसेदिवस, एका भयानक मास्यासारखी.
No comments:
Post a Comment