Wednesday, 17 June 2015




उड्डाण छुप्या आकाशाकडे

मुक्त व्हा तुमच्या चिन्तांपासून 
आणि व्हा पूर्णपणे नितळ 
जणू आरसपानी  . 
ज्यात दिसत नाही एकही प्रतिमा. 

जेव्हा तो रिक्त असतो आकारांशिवाय 
सर्व आकार सामावलेले असतात त्यातच. 
एकाही चेहऱ्याला वाटणार नाही लाज 
असण्याची इतके नितळ. 

हे प्रेम करणे आहे: उड्डाण एका छुप्या आकाशाकडे,
ज्या मुळे गळून पडतात हजारो आच्छादने प्रत्येक क्षणाला 
प्रथमतः, मुक्त व्हा जीवनापासून 
अखेरीला, उचलण्याकरिता  एक पाऊल पावलांशिवाय. 
विचार करा ह्या जगाचा अदृश्य म्हणून 
आणि दुर्लक्ष करा त्याकडे जे वाटते आहे मी व माझे. 
(रुमी : सिलेक्टेड पोएम्स, ccxiii , स्वैर भाषांतर )  
वंदना पाठक 




   

No comments:

Post a Comment