अतिथीगृह
हे मानवी शरीर एक अतिथीगृह
रोज सकाळी एक नवीन पाहुणा.
आनंद ,निराशा किंवा स्वार्थीपणा
जणू एखादा अनपेक्षित येणारा पाहुणा.
काही क्षणभंगूर होणारी जाणीव:
स्वागत आणि आदरातिथ्य करा त्या सर्वांचे;
जरी तो असेल जमाव दु:खांचा
जे भीषणपणे पाडतील तुमचे घर
रिकामे करतील त्यातील फर्निचर
तरीही व्यवहार करा प्रत्येक पाहुण्याशी सन्मानाने
तो तयार करत असेल तुम्हाला एखाद्या नवीन आनंदासाठी.
काळेकुट्ट विचार, शरम , द्वेष,
भेटा त्यांना दारातच हसत हसत.
आणि आमंत्रण द्या त्यांना आत येण्याचे.
कारण प्रत्येकाला आले आहे पाठविण्यात
मार्गदर्शक म्हणून पलिकडून .
( रुमी : सिलेक्टेड पोएम्स, ccxiii , स्वैर भाषांतर )
वंदना पाठक
No comments:
Post a Comment