Thursday, 13 August 2015



                                                        साधन होईन मी देवाचे 

जिथे जिथे वेदना आहे; औषध तिथेच लागते ;

जिथे जिथे गरिबी आहे; मदत तिथेच लागते.

मानव या जगात पूर्णपणे अवलंबून आहे देवाच्या इच्छेवर:

जर तो करेल मला प्याला, मी होईन प्याला,

आणि जर तो करेल मला कट्यार , मी होईन कट्यार,

जर तो करेल मला झरा,  मी देईन पाणी ,

जर तो करेल मला अग्नी, मी देईन उष्णता,

जर तो करेल मला पाऊस, मी उगवेन पीक, 

आणि जर तो करेल मला बाण, मी शिरेन शरीरात ,

आणि जर तो करेल मला साप, मी ओकेन विष,

आणि जर तो करेल मला मित्र, मी करीन सेवा .  

(रुमी, स्वैर भाषांतर )

वंदना पाठक   

No comments:

Post a Comment