Thursday, 31 March 2016

 I 

कोणती कारणे तू देणार , माझ्या मना , इतक्या सर्व उणीवांकरिता  ?

इतकी निष्ठा जीवलगाची , इतका विश्वासघातकीपणा  तुझा!

इतकी उदारता त्याच्याकडून, तुझ्याकडून इतका   क्षुल्लक विरोध ! त्याच्याकडून इतकी जास्त कृपा, इतके दोष घडलेले तुझे !

इतकी इर्षा, इतकी दुष्ट कल्पनाशक्ती आणि इतके वाईट विचार तुझ्या मनात, इतकी रेखाचित्रे, इतके अनुभव,  इतकी उदारता त्याची.

का हे सर्व अनुभव! तुझा कट्टर आत्मा व्हावा गोड म्हणून. का ही सर्व रेखाचित्रे? तू संतांच्या संगतीत जावे म्हणून.            

तुला पश्चाताप वाटतो तुझ्या पापांचा, देवाचे नामस्मरण तुझ्या ओठी; त्याक्षणी तो आकर्षित होतो तुझ्याकडे,  कारण    तो मुक्त करू इच्छितो तुला जीवंत अवस्थेत.  

तुला भीती वाटते अखेरीस तुझ्या चुकांची , तू  शोधतोस हताशपणे  मार्ग मुक्तीचा;  त्याक्षणाला का पाहत नाहीस तू त्याला तुझ्या बाजूला.  त्याला जो भीती भरतो अशी तुझ्या मनात :

जर त्याने बांधले आहेत तुझे डोळे, तू आहेस एका खड्यासारखा त्याच्या हातात; आता तो गडगडवतो आहे तुला असा, आता तो फेकतो आहे तुला हवेत.

आता तो बिम्बवतो तुझ्या स्वभावात उत्कट आवड चांदी,सोने व स्त्रियांची; आता तो बिम्बवतो तुझ्या मनात
प्रकाश  मुस्तफासारखा.

या बाजूला आकर्षित करतो तो तुला प्रियजनांकडे , त्या  बाजूला आकर्षित करतो तो तुला अप्रिय गोष्टींकडे;
या सर्व  भोवऱ्यातून जहाज जाईल पुढे किंवा बुडेल.  

पाठवा वरती इतक्या प्रार्थना, रडा इतक्या दु:खाने  अंधाराच्या ऋतुत, की प्रतिध्वनी पोचेल तुमच्या कानावर क्षेत्रातून सात स्वर्गाच्या.

जेव्हा शोएबचे कण्हणे आणि विलाप आणि अश्रू
 गारावर्षावासामान साऱ्या मर्यादा पार करून गेले,
तेव्हा सकाळी एक घोषणा आकाशातून त्याच्याकरिता झाली.

"जर तू पापी आहे, मी तुला क्षमा केली आहे आणि तुला माफ केले आहे तुझ्या पापाकरिता? स्वर्गाचा शोध घेत आहेस तू ?  अहा, तुला मी तो दिला, शांत हो, थांबव या सर्व प्रार्थना!"   

शोएब उत्तरला, " मी याचा किंवा त्याचा शोध घेत  नाही.  माझी इच्छा देवाला आमोरासमोर पाहण्याची आहे. जरी साती समुद्रांचे आगीत रुपांतर झाले, मी मारीन त्यांच्यात उडी; जर माझी त्याच्याशी भेट होइल. "  

पण जर मला रोकण्यात आले या दृश्यापासून, जर माझे अश्रुपूर्ण डोळे वंचित राहिले त्या दृश्यापासून, तर मी योग्य आहे आगीच्या नरकात राहण्याच्या; स्वर्ग माझ्याकरिता नाही.     
,        
चेहऱ्याशिवाय त्याच्या , स्वर्ग माझ्याकरिता तिरस्करणीय नरक आहे. मी केलेय सेवन या रंगाचे व वासाचे मृत्युच्या; कुठे आहे तेजस्विता अमरत्वाच्या प्रकाशाची?"

ते म्हणाले, " कमीत कमी संयत कर तुझे रडणे; नाहीतर दृष्टी होईल तुझी अंधूक, कारण दृष्टी होते कमी जेव्हा रडणे होते पलिकडे मर्यादेच्या. "

तो म्हणाला, " जर माझे दोन्ही डोळे शेवटी पाहणार असतील या पद्धतीने, प्रत्येक अवयव माझा होईल डोळे : का  करू तक्रार मी अंधत्वाची?

पण जर शेवटी हे डोळे माझे वंचित राहिले नेहमीकरिता,  तर ती नजरच  होऊ देत अंध जी आहे अयोग्य पाहावयास  जीवलगा. "   

Mystical Poems of  Rumi

Free Translation

Vandana Pathak       


No comments:

Post a Comment