ते पिवळेजर्द फूल
निवडुंगाच्या काटेरी झाडावर उमलले
सुंदर पिवळेजर्द फूल
तीक्ष्ण काट्यांनी वेढलेले
ते मनाला घालते भूल
खडकाळ जमिनीत रुजलेले
जणू उपेक्षित गरीब मुल
हिरव्या रंगात सजलेले
दर्शविते जिजीविषेची चाहूल
मानवी जीवनाचे आगळे वेगळे
गुपित मज ला त्यात उमगले
खडतर परिस्थितीत लढले जगले
तरीही ते हसले, खुलले, फुलले
ते निवडुंगाचे पिवळेजर्द फूल
मम मनाला घालते भूल
No comments:
Post a Comment