मन ते ओले
काल धो धो सतत पाऊस पडला
आणि आम्हाला उगाच उपास घडला
बाईक वरून हिंडली मुले चिंब भिजत
भजे , पकोडे , भुट्टे, चहा, मस्ती करत.
माय पण पाण्याने घरातच अडकली
गळणारे पाणी उपसून खूप थकली
रद्दीचा धंदा मला करता नाही आला
घरात शिल्लक नाही पैका खायला.
माझा बाप दारू पिऊन धिंगाणा घाले
मायच्या तोंडपट्टा मात्र चुरूचुरू चाले
मी व बारकी भावंडे चिंब व उपाशी
बसून होतो ओलेते हातपाय पोटाशी.
सर्वत्र दिसते नजरेला माझ्या तफावत
काही भिजतात उगाच हसत खिदळत
काही बसतात उपाशी थंडीने कुडकुडत
फुटक्या आयुष्यातील दु:खे उपसत .
वंदना पाठक
No comments:
Post a Comment