Friday, 10 June 2016

महती चिटोऱ्याची  

गांधीजीनी केला योग्य वापर कागदाचा 
उपयोग केला व्यवस्थित साध्या  चिटोऱ्याचा.   

मी ही नकळत ती छान सवय  स्वीकारली 
कागदांच्या चिटोऱ्यावर काहीतरी लिहू   लागली. 

मी हे असे अनेक खरडलेले चिटोरे  जपलेत 
जीवाच्या पलीकडे वहीपुस्तकात  सांभाळलेत . 

लिफाफ्याची कोरी बाजू असो वा असो पत्रिका 
त्यांच्यावर कोरल्या गेल्या सुप्त इच्छा आकांक्षा. 

त्यांच्यातच सापडतील माझे सर्व अक्षांश रेखांश 
कुठेतरी लिहिले असतील आयुष्याचे मर्म व   सारांश. 

कधीकाळी केली असेल  नाना हिशोबाची मांडण 
कागदाच्या तुकड्यावरच केले रांगोळीचे चित्रण . 

आवडणाऱ्या पंक्ती असो  वा पाककृती आईची
यादी त्यात   भावलेल्या पुस्तकांची व विचारधनाची. 

मनन, टिपण, चिंतन, लेखन, वाचन, संभाषण
सर्वांचे विषयवार तपशीलवार यातच विवेचन. 

सांभाळून ठेवलेत ते चिटोरे जीवाच्या पलीकडे    
टाचून जतन करून ठेवलेत पानांमध्ये इकडेतिकडे. 

कधीकाळी अवचित ते चिटोरे दृष्टीस पडतात    
हरवलेला खजिना मिळाल्याचा आनंद देतात. 

तसा काही दडला नाही त्यांच्यात खजिना फार मोठा 
पण छोटे छोटे क्षणच  फोडतात मनातील दुखाला वाटा.  

जीवनाचे अंकगणित व भूमिती दडली त्यांच्यात 
म्हणूनच दडवून ठेवले आहे मी अनेक चिटोरे संग्रहात. 

वंदना पाठक 





       

Sunday, 15 May 2016



गुणगुणणे आईचे 

माझी आई गुणगुणत असे सतत
वेगवेगळ्या वेळी विविध गीतं
श्लोक व   हिंदी मराठी चित्रपट गीतं
अनेक दुर्लभ अर्थपूर्ण सुभाषितं .

भूपाळीने  होई दिवसाची सुरवात
घनश्याम सुंदराची लकेर गात गात
नंतर गुंजे थंडगार वात सुटत
शरीर मग्न कामांच्या भाऊगर्दीत.

अर्चनाच्या सुरांसोबत लागे सूर
काम चालू राही कुठेतरी खूप दूर
मधूनच धरून ताल एखाद्या ताटावर
मधुर मस्त लकेर गुंजत राही घरभर .

म्हणे कभी कभी मेरे दिलमें खयाल आता है
तर मध्येच अभी अभी दिन था अभी अभी रात  है
नवीन जुन्या दोन्हींची बेमालूम सरमिसळ होई
गायिका व आम्हाला  पण ऐकण्याची  मजा येई.

आता फक्त त्या गाण्यांची आठवण उरली
सुरेल लकेर व गायिका काळप्रवाहात विरली .
कुठून तरी  अजीब दास्तान है कानांवर आलें
भावना, मन  व अश्रुंचे बांध संपूर्ण ढासळले.   

आठवणींचे गाठोडे अवचित उघडल्या गेले
सूर-लकेरांचे मज आज मर्म  उमजले
सुख दुःखाचे, असह्यतेचे  घोट पचविले
संगीत साधनेने उत्स्फूर्त स्व:विरेचन केले. 

मी ही आजकाल गुणगुणायला शिकले
सहजतेने मनावर नियंत्रण ठेवू लागले
राग ,क्रोध, निराशा व दुःख दूरवर पळाले
आईच्या गाण्यांनी जीवनगीत शिकविले.   

वंदना पाठक

Thursday, 31 March 2016

 I 

कोणती कारणे तू देणार , माझ्या मना , इतक्या सर्व उणीवांकरिता  ?

इतकी निष्ठा जीवलगाची , इतका विश्वासघातकीपणा  तुझा!

इतकी उदारता त्याच्याकडून, तुझ्याकडून इतका   क्षुल्लक विरोध ! त्याच्याकडून इतकी जास्त कृपा, इतके दोष घडलेले तुझे !

इतकी इर्षा, इतकी दुष्ट कल्पनाशक्ती आणि इतके वाईट विचार तुझ्या मनात, इतकी रेखाचित्रे, इतके अनुभव,  इतकी उदारता त्याची.

का हे सर्व अनुभव! तुझा कट्टर आत्मा व्हावा गोड म्हणून. का ही सर्व रेखाचित्रे? तू संतांच्या संगतीत जावे म्हणून.            

तुला पश्चाताप वाटतो तुझ्या पापांचा, देवाचे नामस्मरण तुझ्या ओठी; त्याक्षणी तो आकर्षित होतो तुझ्याकडे,  कारण    तो मुक्त करू इच्छितो तुला जीवंत अवस्थेत.  

तुला भीती वाटते अखेरीस तुझ्या चुकांची , तू  शोधतोस हताशपणे  मार्ग मुक्तीचा;  त्याक्षणाला का पाहत नाहीस तू त्याला तुझ्या बाजूला.  त्याला जो भीती भरतो अशी तुझ्या मनात :

जर त्याने बांधले आहेत तुझे डोळे, तू आहेस एका खड्यासारखा त्याच्या हातात; आता तो गडगडवतो आहे तुला असा, आता तो फेकतो आहे तुला हवेत.

आता तो बिम्बवतो तुझ्या स्वभावात उत्कट आवड चांदी,सोने व स्त्रियांची; आता तो बिम्बवतो तुझ्या मनात
प्रकाश  मुस्तफासारखा.

या बाजूला आकर्षित करतो तो तुला प्रियजनांकडे , त्या  बाजूला आकर्षित करतो तो तुला अप्रिय गोष्टींकडे;
या सर्व  भोवऱ्यातून जहाज जाईल पुढे किंवा बुडेल.  

पाठवा वरती इतक्या प्रार्थना, रडा इतक्या दु:खाने  अंधाराच्या ऋतुत, की प्रतिध्वनी पोचेल तुमच्या कानावर क्षेत्रातून सात स्वर्गाच्या.

जेव्हा शोएबचे कण्हणे आणि विलाप आणि अश्रू
 गारावर्षावासामान साऱ्या मर्यादा पार करून गेले,
तेव्हा सकाळी एक घोषणा आकाशातून त्याच्याकरिता झाली.

"जर तू पापी आहे, मी तुला क्षमा केली आहे आणि तुला माफ केले आहे तुझ्या पापाकरिता? स्वर्गाचा शोध घेत आहेस तू ?  अहा, तुला मी तो दिला, शांत हो, थांबव या सर्व प्रार्थना!"   

शोएब उत्तरला, " मी याचा किंवा त्याचा शोध घेत  नाही.  माझी इच्छा देवाला आमोरासमोर पाहण्याची आहे. जरी साती समुद्रांचे आगीत रुपांतर झाले, मी मारीन त्यांच्यात उडी; जर माझी त्याच्याशी भेट होइल. "  

पण जर मला रोकण्यात आले या दृश्यापासून, जर माझे अश्रुपूर्ण डोळे वंचित राहिले त्या दृश्यापासून, तर मी योग्य आहे आगीच्या नरकात राहण्याच्या; स्वर्ग माझ्याकरिता नाही.     
,        
चेहऱ्याशिवाय त्याच्या , स्वर्ग माझ्याकरिता तिरस्करणीय नरक आहे. मी केलेय सेवन या रंगाचे व वासाचे मृत्युच्या; कुठे आहे तेजस्विता अमरत्वाच्या प्रकाशाची?"

ते म्हणाले, " कमीत कमी संयत कर तुझे रडणे; नाहीतर दृष्टी होईल तुझी अंधूक, कारण दृष्टी होते कमी जेव्हा रडणे होते पलिकडे मर्यादेच्या. "

तो म्हणाला, " जर माझे दोन्ही डोळे शेवटी पाहणार असतील या पद्धतीने, प्रत्येक अवयव माझा होईल डोळे : का  करू तक्रार मी अंधत्वाची?

पण जर शेवटी हे डोळे माझे वंचित राहिले नेहमीकरिता,  तर ती नजरच  होऊ देत अंध जी आहे अयोग्य पाहावयास  जीवलगा. "   

Mystical Poems of  Rumi

Free Translation

Vandana Pathak       


Sunday, 27 March 2016


 The Gardener माळी /बागवान

सेवक 

दया करा आपल्या सेवकावर, राणीसरकार !

राणी 

दरबार आटोपला आहे आणि माझे सेवक सर्व गेलेत . तू का इतक्या उशीरा  आलास ?

सेवक 

जेव्हा तुमचे  इतरांबरोबरचे  काम निपटते , ती माझी वेळ.

मी विचारायला आलो की काय शिल्लक आहे तुमच्या शेवटच्या सेवाकाकरिता.

राणी 

काय आशा करतोस तू जेव्हा इतका झाला आहे उशीर ?

सेवक 

करा मला माळी तुमच्या  बगिच्याचा.

राणी 

काय  मूर्खपणा आहे हा?

सेवक 

मी सोडून देईन माझी इतर कामे.

मी फेकतो माझ्या तलवारी आणि भाले खाली जमिनीवर.  नका पाठवू मला दूरच्या दरबारांमध्ये; नका
आज्ञा देऊ करण्याची नवीन विजय. पण करा मला माळी तुमच्या  बगिच्याचा.

राणी 

काय राहतील तुझी कर्तव्ये?

सेवक 

सेवा तुमच्या फावल्या वेळा मध्ये.

मी ठेवीन ताजा हिरवा रस्ता जेथे तुम्ही फिरता सकाळी, जेथे तुमच्या  पाउलाचे अभिवादन होईल प्रशंसेने प्रत्येक टप्प्यावर फुलांनी जे उत्सुक आहे मरायला.

मी तुम्हाला झोका देईन झुल्यावर  फांद्यामधील सप्तपर्णीच्या, जेव्हा लवकर उगवलेला संध्याकाळचा  चंद्र करेल धडपड स्पर्श  करावयास तुमच्या  परकरास पानांमधून.

मी करीन तरोताजा सुगंधी द्रव्याने दिवा जो जळतो तुमच्या पलंगाजवळ, आणि सजवीन तुमचे पाय ठेविण्याचे आसन चंदन आणि केशराच्या मिश्रणाच्या अदभूत मांडणीने.

राणी 

काय तू घेशील तुझे इनाम  म्हणून ?   

सेवक 

मुभा पकडण्याची तुमच्या नाजुक मुठी जशा   कोमल कमळाच्या   कळ्या  आणि सरकवायची फुलांच्या साखळ्या तुमच्या मनगटात; रंगविण्याची तुमची पाऊले पायांची लाल रसाने अशोक पाकळ्यांच्या आणि हलकेच  झटकून टाकण्याची   कण धुळीचा जो संधी पाहत होता तेथे रेंगाळण्याची.

राणी 

तुझी प्रार्थना मंजूर  आहे, माझ्या सेवका, तू होशील माळी माझ्या बगिच्याचा.

Poem  1

Gardener by Rabindranath Tagore

Free Translation by Vandana Pathak